तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथील पी.पी.पटेल कंपनीच्या कामगारांना लाॅकडाऊन काळातील वेतन तात्काळ मिळावे व इतर मागण्या मान्य कराव्यात यासाठी पी.पी.पटेल कामगार संटनेचे अध्यक्ष अंबादास गायकवाड व सदस्यानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करून जीवनयात्रा संपवणार असल्याचे जिल्हाधिकारी याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशासह राज्यामध्ये लाॅकडाऊन घोषीत करण्यात आला. सुरूवातीला कडक लाॅकडाऊनमध्ये कंपनी बंद कालावधीमध्ये केंद्र व राज्य सरकारने कामगाराना घरी बसुन वेतन देण्याचे आदेश दिले. तामलवाडी येथील पी.पी. पटेल या कंपनीने वेतन व भत्ते देण्यास नकार दिला.कामगारांनी भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष शिवाजी सावंत यांच्या मदतीने कामगार मंत्री यांच्याकडे लेखी तक्रार केल्यानंतर मार्च महीन्याचे वेतन दिले.परंतु एप्रिल,मे व आजतागायत कंपनी बंदच असल्याने या दोन महीन्याचे वेतन व भत्ते देण्यास कंपनीचे मालक जयेशभाई पटेल यानी नकार दिल्याने कामगारावर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.एप्रिल,मे महीन्याचे वेतन मिळावे,व कंपनीमध्ये अनेक सोयी सुविधांचा अभाव असल्याने त्या सोयीसुविधा कामगारांना मिळणेसाठी कामगार संघटनेचे अध्यक्ष अंबादास गायकवाड यानी कामगार मंत्री,जिल्हाधिकारी याना पत्रव्यवहार करून मागणी केली,प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कुटुंबासह एकदिवशीय लाक्षणिक उपोषणही केले परंतु याकडे कोणीही याकडे लक्ष देत नसल्याने संघटनेचे अध्यक्ष अंबादास गायकवाड व सदस्यानी सामुदायिक आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार कामगारांनी दिलेल्या मागण्यांची पुर्तता न झाल्याने व प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने दि.१५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करून जीवनयात्रा संपवणार असल्याचे लेखी निवेदन दि.१० रोजी जिल्हाधिकारी याना देण्यात आले आहे. यावर प्रशासन काय निर्णय घेणार याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
निवेदनावर कामगार संघटनेचे अध्यक्ष अंबादास गायकवाड,दत्ता काळे,गुंडू बनसोडे,राजन गुंड,दादा रावळे,सौदागर टोंपे,हरी राऊत यांच्या सह्या आहेत
