काटी : उमाजी गायकवाड
तुळजापुर तालुक्यातील सावरगांव जिल्हा परिषद गटाचे सदस्य राजकुमार पाटील यांच्या जि प तिर्थक्षेत्र निधीतुन बांधण्यात आलेल्या दोन सांस्कृतीक सभागृहाचे लोकार्पण गुरूवारी सावरगांव येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सावरगाव नागोबा मंदिर परिसरात भाविकासाठी सोयीचे सांस्कृतिक सभागृह ही भाविकाची मागणी राजकुमार पाटील यानी पुर्ण केली जि. प. फंडातुन दोन सभाग्रहाची बांधकाम पुर्ण केली त्याचे लोकार्पण आ.राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे , जि प सदस्य राजकुमार पाटील, माजी जि प सदस्य संतोष बोबडे काटी सोसायटीचे चेअरमन विक्रमसिंह देशमुख नगरसेवक बापुसाहेब कणे गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड सरपंच रामेश्वर तोडकरी उपसरपंच आनंद बोबडे, रणजित पाटील, खुंटेवाडीचे चेअरमन महादेव जाधव, पिंटू मुळे, काटीचे सरपंच आदेश कोळी, विलास डोलारे, रंगनाथ डोलारे, रोहीत पाटील, केमवाडीचे राजेंद्र डोलारे, नेताजी कदम, सुधीर मगर, शंकर शिंदे, गणेश सातपुते, सुरेश पवार, ग्रामविकास अधिकारी श्रीशैल्य कोठे, राजसिंह राजेनिबांळकर, नितीन रोकडे, भाऊसाहेब पाटील, बाळासाहेब डोके, अनिल पाटील, गौरीशंकर नकाते, बाळासाहेब जतकर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
शेतीपूरक उद्योगावर भर द्यावा आणि कोरोना पार्श्र्वभूमीवर युवकांनी खबरदारी घ्यावी - आ.राणाजगजीतसिंह पाटील
यावेळी कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना भविष्यात युवकांनी रोजगार निर्मितीसाठी शेतीपूरक उद्योग उभारण्यावर भर देण्याबाबत, तसेच गावातील पाणीपुरवठ्याचा विषय प्राधान्याने मार्गी लावण्या बाबत चर्चा करण्यात आली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना आवर्जून काळजी घेण्याबाबत सांगितले.

