काटी : तुळजापूर तालुक्यातील काटी येथील आशा कार्यकर्ती श्रीमती अनुराधा सिध्दू एडके वय (41) यांचे गुरुवार दि. 25 रोजी सायंकाळी पाच वाजता बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले. त्यांच्यावर बार्शी येथील खासगी रुग्णालयात मागील तीन दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी येथील धनगर समाज स्मशानभूमीत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या अंगणवाडी सेविका सौ. तोळणबाई नागनाथ घायाळ यांच्या कन्या होत्या.

     त्यांच्या  पश्चात एक मुलगा,आई,वडील, तीन भाऊ व भाऊजय असा परिवार आहे.
 
Top