(आंतरराष्ट्रीय आमली पदार्थ सेवन आणी तस्करी निषेध दिवस - 26 जून 2020)
आंतरराष्ट्रिय आमली पदार्थ तस्करी आणि नशा निषेध दिवस दरवर्षी 26 जुनला साजरा करण्यात येतो. 1987 पासून हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. ह्या दिवसाचे महत्व म्हणजे लोकांमधे नशा संबंधी समस्यांवर जनजागृती निमार्ण करणे व दुसरीकडे व्यसनाधीन व्यक्तिचा नशेवर नियंत्रण करून योग्य उपचार करणे आहे सोबतच जागतिक स्तरावर होणारे नशेचे अवैध व्यापारावर संपुर्ण रित्या नियंत्रण करणे आहे. दरवर्षी संयुक्त राष्ट्र संघ एका नवीन थीमसह कार्य करते, या वर्षी 2020 ची थीम "उत्तम केअरसाठी चांगले ज्ञान" आहे. विविध प्रकारच्या चुकीच्या माहितीमुळे औषध समाधानाचे क्षेत्र "कमकुवत" झाले आहे. यंदाची थीम "ड्रग समस्येला" समजून घेणे आणि आरोग्य, शासन आणि सुरक्षिततेवर होणारा परिणाम टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्यास प्रोत्साहन देणे हे आहे. आंतरराष्ट्रिय विमानतळावर नेहमीच कोट्यावधीची हेरोईनची अवैध तस्करी पकडल्याची बातमी ऐकायला मिळते. अशे नशेचा अवैध व्यापार संबंधी अपराध जगभरात घडतच आहेत. मानव आपल्या परंपरा, प्रथा, कर्तव्य, संस्कारापासून दूर होऊन आधुनिकतेच्या आधंळ्या मार्गावर भरकटत चाललाय. युवा वर्गात नशा खुप वेगाने वाढत चालला आहे. पहिल्यांदा व्यसन अतीउत्साहात, दबावाखाली, खूप तानतनावात, जिज्ञासापोटी, मित्रांसोबत मजाकीत, उत्सवांमधे, आधुनिकतेच्या देखाव्यात व इतर मार्गे प्राशण करतो. आमली पदार्थांचे व्यसन पुष्कळ प्रकारचे आहेत जशे- ड्रग, तंबाख़ु, अल्कोहल, चरस, गांजा, अफीम, भांग याचा व्यतिरिक्त पेट्रोल, व्हाईटनर, फेविकॉल सारख्या वस्तुंचा उग्र वास घेणे व इतर.
व्यसन करण्याची कारणें:- बेकारी, निराशा, जिवनातील संघर्ष, तानतनाव, खाली वेळ, नवा अनुभव, नैराश्यपन, खोटा दिखावा, फॅशन, संबंधा मधे कटुता, घरघूती झगडे, एकटेपणा, अज्ञानता, वाईट शेजार्, शारिरीक व मानसीक बिमारी, अपयशपणा, आर्थिक तंगी, कामाची थकावटपणा, खोठे भ्रम आणी व्यसनी लोकांची संगत मुळे मानव आपल्या आत वाईट गुणांना जोपासतो. समोर जाऊन ह्याच वाईट गोष्टि नशेकळे वाढवतात. पण आजकाल आनंदाचा क्षणी जसे वाढदिवस, लग्न, कोणत्याही सणा-सुदिच्या दिवस, सहल, पार्टी च्या नावाखाली नशा केला जातो. आपल्या समाजात नशा सारखा वाईट विष सहजपणे उपलब्ध होतो हिच खूप मोठी चिंतेची बाब आहे. समोर चालून हे व्यसन केव्हा माणसाचा जिवनातील एक भाग बनतो हे कळत सुद्धा नाही आणी मनुष्य व्यसनाचा आहारी जातो.
व्यसनावर स्व नियंत्रणाचे उपाय :-
* व्यसनी व्यक्तीचे स्वनियंत्रण दृढनिष्चय आणी मदत समूह सर्वात चांगले नियंत्रण आहे.
* नशेपासून लांबी बनविणे, चिकीत्सा करणे, रोकथामाच्या नियमांचे पालन करणे, डॉक्टरांशी मोकळेपणाने बोलावे, मनात येणारे प्रश्नांचा तज्ञांद्वारा निराकरण करणे.
* एकटेपणात न रहावे, इतरांकडे आपले मन मोकळे करावे, शक्य असेल तर् नेहमी परिवारासोबतच रहावे.
* व्यसनावर आता पर्यत केलेल खर्च आणी त्या द्वारे झालेले शारिरीक, मानसिक, पारिवारीक, आर्थिक, सामाजिक तोटा हया गोष्टींवर एकदा मूल्यांकन करून पहावे.
* आपल्या स्वतःची काळजी घेणे, र्निव्यसनी लोकांचा संपर्कात येणे, ध्यान साधना करणे, आपले नवे खेळ कूद, छंद जोपासायला शिकणे, तानतनावाला स्वास्थ मार्गाने सोळविणे व निरंतर चिकीत्सा करत रहावे.
* विशेष रूपाने पालकांनी आपल्या मुलांसोबत एका मित्राप्रमाणे व्यवहार करावा, त्यावर नियंत्रण ठेवावे, लहानपणा पासूनच मुलाना चांगल्या-वाईट गोष्टिंची समझ द्यावी व आपले मुल कशा प्रकारच्या मित्रांसोबत वावरतात याची जाण ठेवावी, मुलांवर चांगले संस्कार व त्यांना योग्य वातावरण निर्माण करून देणे.
* जेव्हा केव्हा व्यसनाची इच्छा होईल तर् आपल्या परिवारातील लोकांना, त्यांचा आनंदाचा, आपल्या कर्तव्याची, जबाबदारीची, जें लक्ष्य पुर्ण करायचे आहे त्यांची आठवण करायची.
* व्यसनापासून मुक्तता करिता प्रेरित करणारे सकारात्मक व्यक्ती, समूह, मित्रमंडळी, पुस्तकांचे वाचन, लेखनाच्या संपर्कात रहावे व स्वताला व्यस्थ ठेवावे.
* पारिवारीक, सामाजिक, आर्थिक दायित्वांना समजणे आणी आपल्या कर्तव्याची जाण ठेवणे.
- डॉ. प्रितम भि. गेडाम
मो. नं. 82374 17041
prit00786@gmail.com