तुळजापुर : कुमार नाईकवाडी
संपुर्ण देशासह राज्यात लाँकडाऊनची परस्थिती असताना भाजपाचे आमदार गोपीचंद पडवळकर यांनी देशाचे जेष्ट नेते रा.काँ पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या बद्दल पंढरपूर येथे बेताल वक्तवय करुन जाणीव पुर्वक जाती वाचक उल्लेख करुन सामाजिक शांतता कायदा सुव्यवस्था बिघडवल्या प्रकरणी पडळकर यांच्या वर गुन्हा दाखल करावा अशा प्रकारचे एक लेखी निवेदन तुळजापुर तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात असे म्हटंले आहे की भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडवळकर यांनी दि.२४ बुधवार रोजी पंढरपूर शहरात शरदचंद्र पवार यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करुन सध्या संपुर्ण देशात लाँकडाउनची परस्थिती असताना जाणीव पुर्वक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करुन शांतता कायदा सुव्यवस्था बिघवडण्याचा कुटील बेत केला. या मुळे संपुर्ण महाराष्ट्रात रा.काँ.च्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. तरी आ.गोपीचंद पडळकर यांच्यावर कायदा सुव्यवस्था अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर रा.काँ.चे गोकुळ शिंदे, शफी शेख दिगबंर खराडे तौफीक शेख संदीप गंगणे शरद जगदाळे सचिन कदम बबन गावडे,नितीन रोचकरी शशीकांत नवले दुर्गेश सांळुके आप्पा पवार खंडु जाधव विजय सरडे आदीसह रा.काँ.च्या कार्यकर्त्यांच्या या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.