काटी : उमाजी गायकवाड

तुळजापुर तालुक्यातील काटी येथील मराठा समाज सेवा मंडळ सोलापूर, संचलित येडेश्वरी कन्या प्रशालेच्या परिसराची व  सर्व खोल्यांची येथील ग्रामपंचायतीच्या वतीने बुधवार दि.(24) रोजी निर्जंतुकीकरण करण्यात आले.

 नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. मात्र, कोरोनामुळे शाळा सुरु करण्याबाबत शासनस्तरावर निर्णय प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे शासन जेव्हा मार्गदर्शक सुचना करेल तेव्हाच शाळा सुरु करण्यात येणार आहेत अशी माहिती प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. विजया पाटील यांनी दिली.नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले असले तरी शिक्षकांना सदर कालावधीत शाळेत उपस्थित राहण्यासाठी कोणत्याही प्रकारची सक्ती केलेली नाही. परंतु ऑनलाईच्या माध्यमातून मोबाईल ऍपव्दारे विद्यार्थ्यांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.  प्राथमिक शाळा सुरु करण्यापुर्वी ज्या शाळांचा वापर क्वारंटाईनसाठी केला आहे, त्या शाळा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने काटी येथील मराठा समाज सेवा मंडळ सोलापूर, संचलित  येडेश्वरी कन्या प्रशाला येथील ग्रामपंचायतीच्या वतीने  ग्रामपंचायत कर्मचारी अनिल बनसोडे,दत्तात्रय छबिले यांच्या मार्फत करण्यात आले.     



यावेळी प्रशालेचे सहशिक्षक सुनिल खेंदाड,श्री कदम सर व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
 
Top