उस्मानाबाद : माजी आमदार रेवाप्पा माने यांच्या सुविद्य पत्नी पार्वतीबाई रेवाप्पा माने यांचे बेंबळी येथिल राहत्या घरी दुखःद निधन झाले मृत्यूसमयी 96 वय होते.
स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळात संयुक्त महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे सदस्य होते.पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे विश्वासू म्हणून आ.माने सर्व महाराष्ट्राला परिचित आहेत.पक्ष संघटन मध्ये महाराष्ट्रात पक्ष वाढीसाठी खूप मोठे योगदान पाहून त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या प्रदेश सरचिटणीस पदाची धुरा सांभाळली.
भारतीय संविधानाचे जनक डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचे मराठवाड्याचे पहिले अध्यक्ष होते.मिलींद महाविद्यालयास त्यांनी 12 लक्ष चा निधी दिला. कळंब विधान सभा मतदार संघातून न मागता उमेदवारी दिली व विजय संपादन केला.
पार्वतीबाई माने यांनी मुलांची शिक्षणाची जबाबदारी उचलून सर्वांना उच्च शिक्षण दिले त्यांच्या पश्चात लातूर न.प.चे माजी नगरअध्यक्ष मोहन माने,अरूण माने आप्पा माने राजाभाऊ माने बाळासाहेब माने पाच मुले सुना असा परिवार होत अत्यंत मनमिळावू,मृदू स्वभावाने सर्व पंचक्रोशिला त्या परिचित होत्या. त्यांच्या दुख:द निधनाची वार्ता कळताच बेंबळीसह पंचक्रोशित शोककळा पसरली.