मुरूम, दि. ९ : येथील सामाजिक संघटना किसान ब्रिगेडच्या वतीने मंगळवारी (ता.नऊ) रोजी हिंदू स्मशानभूमीचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आली. मुरूम शहरामधून जाणाऱ्या जुन्या आष्टाकासार रस्त्यालगत असणाऱ्या हिंदू स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात काटेरी झाडेझुडपे वाढल्याने परिसर अस्वच्छ झाला होता. हे पाहून संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष भगत माळी यांच्या पुढाकाराने या परिसरातील वाढलेली झाडे-झुडपे काढून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी ओंकार चव्हाण, गणेश जोगी, नितेश राजपूत, शिवाजी जाधव, शिवराम थोरात, शुभम राजपूत आदींनी पुढाकार घेऊन श्रमदान केले. या त्यांच्या योगदानाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
 
Top