मुरुम, दि. 24 : उमरगा तालुक्यातील मुरूम येथील बसव प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित कोरोना-१९ युध्दांचा कृतज्ञता व गौरव समारंभ मुरुम नगरपरिषदेच्या प्रागंणात मंगळवार (दि. २३) रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील होते. यावेळी नगराध्यक्षा अनिताताई अंबर, मुख्याधिकारी हेमंत केरूरकर, उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, सपोनि यशवंत बारवकर, माजी नगराध्यक्ष सुधीर अंबर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी सत्यजित डुकरे, डॉ.सुवर्णा पाटील, डॉ. शिवशंकर कारडामे, डॉ.महेश जिरोळे, डॉ.गिरीष मिणियार, डॉ.खाजालाल ढोबळे, डॉ.राहूल चिलोबा, मेडीकल असोसिएशन राजेश्वर मुदकण्णा, शितल पाटील, गोविंद पाटील, दिलीप बिराजदार, अल्ताफ येणेगूरे, शिवानंद मुदकण्णा, सुशांत चिलोबा, महेश ब्याळे, नरेश हंभीरे, अमर शिंदे, बसवराज हुळमुजगे, अभय भालेराव, जाफर मोमीन, महावितरणचे अभियंता सचिन वाघमारे, प्रविण राठोड, बालाजी सावंत, प्रकाश रणसुरे, नंदकुमार शिंदे, सहशिक्षक कल्लाप्पा पाटील, भगत माळी, पत्रकार प्रा.डॉ.महेश मोटे, डॉ.सुधीर पंचगल्ले, राजेंद्र कारभारी, देवराज संगुळगे आदीसह आरोग्य, पोलीस, नगर परिषदेचे कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रतिष्ठानकडून शरणजी पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.
यावेळी शरणजी पाटील म्हणाले की, कोरोनाच्या महामारीमध्ये सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून विविध क्षेत्रातील नागरिकांनी जे योगदान दिले ते अतिशय महत्त्वाचे असून या योगदानामुळेच शहरांमध्ये कोरोनाची लागण झालेली नाही. सर्वांनी शासकीय नियमांचे पालन काठेकोरपणे सर्व नागरिकांनी जबाबदारीने केल्यास कोरोनाचा नायनाट नक्कीच होईल. अशाच पद्धतीने या शहरातील नागरिकांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून तरुणांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे आहे. बसव प्रतिष्ठाणने ही बांधीलकी जपून विविध क्षेत्रातील काम केलेल्या नागरिकांप्रती कृतज्ञता भाव ठेवून उपक्रम घेतला आहे. तो निश्चितच उपक्रमशील व स्तुत्य आहे. यामुळे काम करणाऱ्या व्यक्तींना ऊर्जा व प्रोत्साहन मिळते आणि त्यातूनच पुढे त्यांच्या हातून चांगले काम होऊ शकते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बसव प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष रामलिंग पुराणे यांनी केले. सूत्रसंचालन किरण गायकवाड तर आभार सुधीर अंबर यांनी मानले.