मुरूम दि. 29 : कोरोना संकटाच्या काळात तालुक्यातील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी जीवाची परवा न करता जे योगदान दिले त्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्या व्यक्तींना सन्मानित करण्याच्या हेतूने महाराष्ट्र पत्रकार संघाचे नागरी गौरव पुरस्कार सोमवारी (ता.२९) रोजी राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी जाहीर केले आहेत.
यामध्ये उमरगा तालुक्यातील पोलीस निरीक्षक माधव गुंडीले, सामाजिक कार्यकर्ते भूमिपुत्र वाघ, सुभाष वैरागकर, अमित रेड्डी, खंडू दूधभाते, आरोग्य सेविका सोनाली सगर, रोटरी क्लबचे उपप्राचार्य डॉ.संजय अस्वले, मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा.किरण सगर, रोटरीचे डॉ.विनोद देवरकर, सामाजिक कार्यकर्ते विक्रम दासमे, किरण गायकवाड, भगत माळी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अशोक मिनियार, डॉ.शिल्पा डागा, अभय भालेराव, डॉ.शिवशंकर कारडामे, प्रा.गुलाब राठोड, डॉ.पंडीत पुरी, डॉ.सत्यजित डुकरे, अॅड.शितल चव्हाण, यशवंत बारवकर, निजगुण स्वामी, पत्रकार महेश निंबरगे, राजेंद्र कारभारी, सचिन बिद्री, सुरेंद्र सक्करगी, जाफर शेख, प्रशांत जाधव, लोहारा तालुक्यातील दैनिक भास्करचे तालुका प्रतिनिधी इक्बाल मुल्ला, सुधीर कोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.रमाकांत जोशी, डॉ.दीपिका चिंचोले, हरी फाठक, तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर लाईव्हचे संपादक शिवाजी नाईक, संजय पारवे, डॉ.खाजालाल ढोबळे, कळंब तालुक्यातील मअंनिसचे प्रा.बालाजी राऊत, शिवाजी सावंत, परंडा तालुक्यातील पत्रकार प्रकाश काशीद, प्रमोद वेदपाठक, भूम तालुक्यातील पत्रकार अरुण देशमुख, प्रमोद कांबळे, प्राचार्य डॉ.श्रीकृष्ण चंदनशिवे, वाशी तालुक्यातील पत्रकार नेताजी नलवडे, अमित कवडे, शिवाजी शिंदे, बालाजी बिदे, राजेश्वर मुदकण्णा, किशोर व्हटकर आदी व्यक्तींना कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर होऊन सदर तालुक्यातील कोरोना योद्धांना ऑनलाईनद्वारे त्यांना सन्मानपत्र पाठवून सन्मानित करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर, मराठवाडा अध्यक्ष प्रविण मोरे, जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे, उपाध्यक्ष अमोल पाटील, जिल्हा सचिव प्रा.डॉ. सुधीर पंचगल्ले, उमरगा तालुकाध्यक्ष बालाजी व्हनाजे यांनी जाहीर केले.
सध्या राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्याने सार्वजनिक कार्यक्रम न घेता अप्रत्यक्षरित्या ऑनलाईनद्वारे सन्मानपत्र ई-मेलद्वारे पाठवून सन्मानित करण्यात येणार असल्याचे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.