काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी गावास भेट देऊन प्रशासनामार्फत केलेल्या उपाययोजनांची पाहणी केली.गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना आर्सेनिक अल्बम-३० या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या, मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्याच्या सुचना दिल्या शक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम-३० या गोळ्याचा वापर कसा करावा तसेच येणाऱ्या काळात कोरोना बाधित रुग्ण प्रति कोणताही भेदभाव न ठेवता त्याला परत मूळ प्रवाहात आणण्यासाठी मानसिक आधार व बळ द्या, वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, महसूल अधिकारी यांनी सतर्क राहावे. तसेच ग्रामस्थांनी प्रशासन मार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले .
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे-पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता लोंढे, तामलवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितिन मिरकर , शिवसेना तालुका प्रमुख जगू गवळी , शिवसेना उपतालुका प्रमुख प्रदीप मगर ,ग्रामसेवक,तलाठी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.