तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदी माया शक्ती असलेल्या श्री तुळजा भवानी मातेच्या नगरीत दि.२६ शुक्रवार रोजी संसर्गजन्य कोरोना या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर अंत्यत साध्या पद्धतीने सोसल डिसटन्स पाळुन मोजक्याच लोकांच्या उपस्थित शिवाजी चौक येथील शाषकीय विश्राम गृह येथे महाराष्ट्र राज्य पञकार सुरक्षा समितीच्या वतीने देण्यात येणारा स.न.२०२० चा आर्दश पञकार राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

यावेळी महाराष्ट्र राज्य पञकार सुरक्षा समितीचे प्रांत अध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते आदर्श पञकार पुरस्कार सोहळ्याचे वितरण करण्यात आले. या वेळी सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ पवार यांच्या उपस्थिती होती.या मध्ये आदर्श पञकार म्हणून नळदुर्गचे आयुब शेख, इटकळचे दिनेश सलगरे, तुळजापुर शहरातील धनराज न्युज च्या वृतनिवेदिका किरण चौधरी, पञकार सचिन ताकमोघे,राहुल कोळी, कुमार नाईकवाडी, प्रविन राठोड, कलीम शेख आदीसह पञकारांना सन्मान चिन्ह व प्रमाण पञ देवुन गौरविण्यात आले.
 
Top