तुळजापूर : कुमार नाईकवाडी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनाचे औच्युत साधुन उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा धाराशिव कळंबचे आमदार कैलास पाटील यांच्या आदेशानुसार व युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१९ शुक्रवार रोजी तुळजापुर शहरातील प्रभाग क्रमांक 8 जवाहर गल्लीतील सर्व नागरिकांना घरोघरी जाऊन आर्सेनिक अल्बम 30c. गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख सुधीर कदम,युवासेना शहरप्रमुख सागर इंगळे,शिवसेना उपशहरप्रमुख बाळासाहेब शिंदे,बापुसाहेब नाईकवाडी,दिनेश रसाळ,रोहित चव्हाण,प्रदिप इंगळे,अर्जुन साळुंके,रोहित नागनाथराव चव्हाण,सिद्राम कारभारी आदी मान्यवर उपस्थित होते.
