मुरूम, दि. २८   : कोरोना संकटाच्या काळात जिल्हयातील विविध संस्थांनी जे बहुमुल्य योगदान दिले त्या संस्थांची दखल घेऊन त्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची  प्रत्यक्ष भेट घेवून त्यांना सन्मानित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पत्रकार संघाचे संस्थात्मक पुरस्कार रविवारी (ता.२८) रोजी जाहीर करण्यात आले आहेत. 

यामध्ये श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना मर्यादित, मुरूम, भाऊसाहेब बिराजदार नागरी सहकारी बँक लिमिटेड, उमरगा, श्रीकृष्ण रक्तपेढी, उमरगा, श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, नगर शिक्षण विकास मंडळ, नगर परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, मुरूम, श्रीकृष्ण सेवाभावी संघ, गुंजोटी तर व्यक्तिगत कोरोना योद्धा पुरस्कार दैनिक सकाळचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्रकुमार जाधव, उमरगा रोटरीचे सचिव प्रा. युसूफ मुल्ला, बसव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रामलिंग पुराणे, दैनिक सकाळचे तालुका बातमीदार अविनाश काळे, दैनिक पुण्यनगरीचे उमरगा-लोहारा तालुका प्रतिनिधी बालाजी वडजे, दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी समीर सुतके, दैनिक दिव्य मराठीचे तालुका प्रतिनिधी अंबादास जाधव, पीप्युल्स अॅल्लम्पिक असोसिएशन इंडियाचे सचिव महमंदरफी शेख आदींसह उमरगा, लोहारा, तुळजापूर, कळंब, भूम, वाशी, परंडा तालुक्यातील कोरोना योद्धांना ऑनलाईनद्वारे त्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलास कोळेकर, उपाध्यक्ष विनोद वर्मा, जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे, उपाध्यक्ष अमोल पाटील, उमरगा तालुकाध्यक्ष बालाजी व्हनाजे यांनी ही माहिती दिली. सध्या राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्याने सार्वजनिक कार्यक्रम न घेता काहींना प्रत्यक्ष भेटून तर काहींना अप्रत्यक्षरित्या ऑनलाईनद्वारे सन्मानपत्र ईमेलद्वारे पाठवून सन्मानित करण्यात येणार आहे. 

 
Top