उस्मानाबाद, दि. 19 : लॉकडाऊन मध्ये दुधाच्या दरात प्रचंड घसरण झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटर 10 रुपये अनुदान, दूध पावडर करिता प्रतिकिलो 50 रुपये अनुदान तसेच दूध पावडर, बटर व तूप यावरील जीएसटी कमी करण्याची मागणी जनता दल सेक्युलर  पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

       कोरोना संसर्गामुळे दुधाचे दर कोसळले असून दुधापासून तयार होणारे मूल्यवर्धित खाद्य पदार्थ ,मिठाई, हॉटेल, आईस्क्रीम ,विवाह समारंभ या सर्वावर परिणाम झाल्यामुळे दुधाची विक्री घटली आहे. टाळेबंदित पिशवीबंद दूध विक्रीत ही घट झाली आहे .गाय व म्हैस यांच्या दूध दरातही 10 रुपयांनी घट झाली आहे. उत्पन्न व खर्चात मेळ बसत नसल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गाईचे दूध प्रति लिटर 35 रुपये तर म्हशीचे दूध प्रति लिटर 45 रुपये दराने खरेदी करणे अत्यंत गरजेचे आहे. लॉकडाऊनमध्ये निर्बंध असल्यामुळे दूध उत्पादकांना अत्यंत कमी भाव मिळाला असल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे . कोरोना विष्णूच्या प्रादुर्भावाने दूध व्यवसायावर संक्रांत आली आहे .लॉकडाऊनमुळे हॉटेल ,आईस्क्रीम, मॉल, विवाहसोहळे बंद असल्यामुळे त्याचा दुधाच्या खपावर विपरीत परिणाम झाला आहे .राज्यात दररोजचे दूध उत्पादन 119 लाख लिटर आहे .52 लाख लिटर हे अतिरिक्त झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये आर्थिक संकटात सापडलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर दुधास 10 रुपये, दूध पावडर प्रति किलो करिता  50 रुपये अनुदान देण्यात येऊन दूध पावडर ,बटर व तूप यावरील जीएसटी कमी करण्याची मागणीही ॲड भोसलें यांनी केली आहे.
 
Top