तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन दि. १७ ते २७ जुलै या कालावधीत होणार्या शिवसप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी तुळजापूर शहरातील कोवीड उपचार केंद्र येथील काॅरटाईन केलेल्या नागरिकांना अन्नदान करण्यात आले.
या वेळी शिवसेना शहरप्रमुख सुधीर कदम, शिवबाराजे प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष अर्जुन साळुंखे, शिवसेना उपशहरप्रमुख दिनेश रसाळ, सोशल मिडीया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, शंकर गव्हाणे, रोहित नागनाथराव चव्हाण,बालाजी पांचाळ,सिद्राम कारभारी, आदीसह क्वारटाईन केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाँक्टर आदीसह कर्मचारी उपस्थित होते.