जळकोट, दि.१९ : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील संभाजीनगर भागातील पती नंतर पत्नीही कोरोना बाधित निघाली आहे. एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाने घेरल्याने जळकोट हादरून गेले आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी ग्रामपंचायत व प्रशासन कडक नियमांची अंमलबजावणी करत आहे.
सध्या जगभर कोरोना रुग्ण दररोज हजारो पटीने वाढत आहेत. ही चिंतेची बाब आहे. जळकोटमध्ये गेल्या आठवड्यात एक व्यावसायिक तरुण कोरोना बाधित निघाला. या बाधित रुग्णाच्या संपर्कातील एकूण २६ संशयितांना तुळजापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. या २६ संशयित पैकी २४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. कोरोना बाधित रुग्णाच्या कुटुंबातील १३ वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह निघाला. तर त्याच्या पत्नीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाने घेरल्याने जळकोट गाव हादरून गेले आहे. रविवारी 30 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव आल्याचा रिपोर्ट आल्यानंतर नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान कोरोनावर मात करण्यासाठी जळकोट व प्रशासन, वैद्यकीय कर्मचारी गावात लक्ष ठेवून आहेत. कोरोना चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत तर्फे नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.