तुळजापुर : कुमार नाईकवाडी

तुळजापुर घाटातील एस वळणार ट्रक व मोटार सायकलच्या झालेल्या अपघातात दुचाकीवर ट्रक पलटी झाल्याने दुचाकी वरील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार रोजी घडली. दरम्यान, एकाचा उपचारा दरम्यान  मृत्यू झाला.

 या बाबत सविस्तर वृत असे की, तुळजापुर घाटातील एस वळणार रविवार दि. १९ रविवार रोजी ४/३० सुमारास तुळजापुर हुन सोलापुर कडे बांबु घेऊन जाणारा ट्रक  क्र M.H.17 B.D. 7004  हा घाटातील एस वळणार जात असताना सिंदफळ येथुन दुचाकी गाडी क्रं M.H.25 A.क्यु 18 15 या दुचाकीवर दोघेजन तुळजापुर कडे येत असताना ट्रक या दुचाकीवर ट्रक पलटी होवुन लाकडी बांबु च्या ढिगार्या खाली दुचाकी स्वार अडकलले. या मध्ये दुचाकी वरील  रिटायर ए.टी.चालक विश्वभंर किसनराव कुलकर्णी वय वर्षे ६० रा.सिदफंळ ता.तुळजापुर  तर दुसरा मनोज सुभाष शिंदे वय वर्षे २४ हा गंभीर जख्मी झाल्याने या दोघाना तातडीने येथील उपजिल्हा रुग्नालयात आणले असता त्या पैकी रिटायर एस.टी चालक विश्वभंर किसनराव कुलकर्णी यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दुसरा गंभीर जख्मी झालेल्या मनोज सुभाष शिंदे रिक्षाचालक या जिल्हा रुग्नालयात नेण्यात आले. सदरील या अपघातातील ट्रक ड्रायव्हर फरार झाला होता. 


 
Top