काटी : उमाजी गायकवाड

 तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील चेकपोस्ट वरील पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगिरी बद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सत्कार केला.

    कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापुर उस्मानाबाद जिल्हा सिमेवर कोविड19 संदर्भात उभारलेल्या आलेल्या  पोलीस तपासणी चेकपोस्टला आरोग्यमंत्री राजेश टोपे खा.ओमराजे निंबांळकर यांनी भेट देवून ड्युटीवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे पुष्पगुच्छ  देवुन स्वागत केले. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे  सोलापुर दौरा आटोपुन उस्मानाबादकडे जात असताना रविवारी पाच वाजता त्यांनी तामलवाडी गावानजिक असणाऱ्या पोलीस तपासणी चेकपोस्टला भेट दिली. यावेळी पोलीस कर्मचारी पाच महीन्यापासुन कोरोना लॉकडाऊन काळात कर्तव्य पार पाडत असलेल्या पोलिसांचा उत्कृष्ठ कामगीरीबद्दल पुष्पगुच्छ देवुन कर्तव्यावर असणाऱ्या पोलीसांचा सत्कार केला. 


      यावेळी खासदार ओमराजे निबiळकर,आदीत्य गोरे, तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे पोकॉ.आकाश  सुरनुर आदीजण उपस्थितीत होते. 
 
Top