काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील जागृत देवस्थान तथा ग्रामदैवत श्री नागनाथ महाराज यांच्या श्रावण अमावास्या ते नागपंचमी या दरम्यान सुरू होणारी सावरगाव पंचक्रोशीतील प्रसिद्ध नागोबा यात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे.
शनिवार आणि रविवारी दि. 18, व 19 रोजी सायंकाळी तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुकाराम काळे, सपोनि जमदाडे, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष बोबडे, सरपंच रामेश्वर तोडकरी, उपसरपंच आनंद बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा कमिटीच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सावरगाव येथील या यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेले व एकमेकांचे कट्टर हाडवैरी समजले जाणारे नाग, पाल, विंचू एकत्रित येण्याची शंभर वर्षांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेली ही यात्रा प्रथमच कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खंडीत करण्यात आल्याने यंदा पंचक्रोशीतील भाविक या यात्रेला मुकणार आहेत. यंदा कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर मंदीरात कोणालाही प्रवेश दिला जाणार नसून ठराविक लोकांच्या उपस्थितीत धार्मिक सेवेकरी आणि मानकरी यांच्या उपस्थितीत विधी पार पडणार आहेत.
या बैठकी दरम्यान तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुकाराम काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जमदाडे, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष बोबडे, सरपंच रामेश्वर तोडकरी, उपसरपंच आनंद बोबडे, मानकरी दत्तात्रय लिंगफोडे, पत्रकार यशवंत कुलकर्णी, पोहेकॉ आकाश सुरनर, पोलीस पाटील समाधान डोके,माजी चेअरमन अरविंद भडंगे, श्रीधर पाटील, रमेश भालेकर, दयानंद भालेकर, तुकाराम गवळी, अनिल पाटील, बापू डोलारे, बाळासाहेब माने, राहुल माने, निलेश माळी, नंदकुमार पाटील, बाळासाहेब डोके, संतोष माळी आदी मान्यवर उपस्थित होते.