तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंञी राजेश टोपे हे रविवार रोजी सोलापूर जिल्हा भेटी नंतर उस्मानाबाद येथे तुळजापुर मार्गे येत असताना तालुक्यातील तामलवाडी, माळुब्रां, सांगवी आदी गावात स्वागत करण्यात आले.
यानंतर तुळजापुर कडे येत असताना उस्मानाबाद बायपास वर तुळजापुर तालुका रा.काँ.च्या वतीने दि.१९ रविवार रोजी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंञी राजेश टोपे सध्या आपण महाराष्ट्रात सध्या महामारी कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर आपण चांगल्या प्रकारे काम करीत असल्याने रा.काँ.च्या कार्यकर्त्यांना आपला अभिमान आहे असे सांगून गौरविण्यात आले.
![]() |
मालुंब्रा येथे सत्कार करताना |
यावेळी त्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी रा.काँ युवक चे जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, गोकुळ शिंदे, विजय सरडे, रा. काँ.शहर अध्यक्ष शरद जगदाळे, गणेश नन्नवरे, संदीप गंगणे, दुर्गेश सांळुके, मनोज माडजे, महेश चोपदार, आप्पा पवार, बाळासाहेब चिखलकर, तौफीक शेख, आरीफ बागवान आदीसह रा.काँ.कार्यकर्ते उपस्थित होते.त्यानंतर आरोग्य मंञी राजेश टोपे उस्मानाबाद कडे रवाना झाले.