उस्मानाबाद, दि. १९ : कोविड- 19 रोगाच्या संक्रमनास आळा बसावा यासाठी शासन तसेच जिल्हा प्रशासन यांनी धाबा, हॉटेल, दुकाने, आस्थापना यांसाठी विविध मनाई आदेश जारी केले आहेत. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द पोलीस प्रशासना तर्फे मोहिम उघडण्यात आली असुन कसुरदारां विरुध्द गुन्हे नोंदवण्यात येत आहेत. त्यानुसार खालील कारवाई करण्यात आली.
1) दि. 17.07.2020 रोजी 17.00 ते 17.30 वा. सु. बायपास रोड, उमरगा येथे 1)दत्तु याशवंत सुरवसे, रा. उमरगा यांनी ‘जगदंब ढाबा’ तर 2)अमित लक्ष्मण पाचंगे, रा. उमरगा यांनी ‘तुळजाभवानी हॉटेल’ मध्ये कोविड- 19 संसर्गाच्या अनुशंगाने ढाबा- हॉटेलचे निर्जंतुकीकरणाबाबत व्यवस्था न करता, कामगारांत स्वच्छता न राखता ढाबा- हॉटेल चालू ठेवले असतांना पो.ठा. उमरगा यांच्या पथकास आढळले. यावरुन नमूद दोघांविरुध्द पो.ठा. उमरगा येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
2) फकीरा विठोबा फोपले, रा. जवळा हे दि. 18.07.2020 रोजी 14.45 वा. मौजे जवळा पाटी येथील आपले ‘हॉटेल सोहम’ चालू ठेउन कोविड- 19 संसर्गाच्या निर्मुलनार्थ कोनतीही खबरदारी न बाळगता ग्राहकांना चहा विक्री व्यवसाय करत असतांना पो.ठा. परंडा यांच्या पथकास आढळले.
वरील प्रमाणे मनाई आदेशांचे उल्लंघन केल्या प्रकरणी पोलीसांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद 3 आरोपींविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 269 सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाय योजना नियम- 11 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.