अणदूर, दि. १९ : 

ग्रामीण  भागातील काही नविन कलाकारांना घेऊन तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील रवी निर्मळे हे "कट्टा मराठी अड्डा" या ग्रुपच्या माध्यमातून एका शॉर्ट फिल्म ची निर्मिती करत आहे. या शॉर्ट फिल्मचे नाव "पादुका" असून त्याचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.

सदरील शॉर्ट फिल्मची पुणे येथे ऑगस्ट महिन्यापासून चालू करण्यात येणार आहे. रवी निर्मळे यांची ही पहीलीच शॉर्ट फिल्म असुन आगामी काळात ते अजुन 2 शॉर्ट फिल्म व 1 वेब सिरीज करणार आहेत. पादुका या शॉर्ट फिल्मचे लेखन व दिग्दर्शन मयुर सोनवणे यांनी केले आहे. यामध्ये अनुष्का मारुती पाटील, संतोष शिराळे, प्रतिक्षा सुर्यवंशी, योगेश्वर चित्ते, ज्योतिबा अनभुले, रवि निर्मळे, प्रतिभा भोसले, संजय मुंडीक, वैष्णवी माळी, धनराज अटवाल, संजय मकासरे, सुशांत मुंडीक, कृष्णा सोनवणे, अर्चना कुळकर्णी, रसिता शिंपी, पूर्णानंद मेहेंदळे,गौरव पाटील, अमोल मोहीते, संकेत शिंदे आदीं क या शॉर्ट फिल्म मध्ये काम करणार आहेत.
 
Top