उस्मानाबाद, दि. 12 : उस्मानाबाद जिल्हयात आज रविवार दि. 12 जुलै रोजी नवीन 17 करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आज बाहेरील जिल्ह्यात पॉजिटीव्ह आलेल्या व बाहेर जिल्ह्यात 7 रुग्ण उपचार घेत असल्याने आज जिल्ह्यात एकूण 24 रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे. उस्मानाबाद जिल्हयात एकूण रुग्णसंख्या 378 वर पोहचली आहे. तर 237 रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत.

लातूर व अंबजोगाई येथे तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी आज एकूण 152 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी यापैकी 13 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 17 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 5 अनिर्णित आहेत. तसेच आज बाहेरील जिल्ह्यात पॉजिटीव्ह आलेल्या व बाहेर जिल्ह्यात उपचार घेत 7 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे आज जिल्ह्यात एकूण 24 रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे.‍

पॉजिटिव्ह रुग्णांची माहिती 

* उस्मानाबाद तालुका -03.
-59 वर्षीय पुरुष (महादेव गल्ली, उस्मानाबाद ), 60 वर्षीय पुरुष (भिकार सारोळा ), 25 वर्षीय पुरुष (कसबे तडवला ). 

*उमरगा तालुका -07.
-50 वर्षीय पुरुष (आरोग्य नगर, उमरगा ), 62 वर्षीय पुरुष (उमरगा शहर ), 18 वर्षीय स्त्री (पतंगे रोड उमरगा ), 10 वर्षीय मुलगा (पतंगे रोड, उमरगा ), 28 वर्षीय स्त्री (एकोंडी, ता उमरगा ), 27 वर्षीय पुरुष (एकोंडी, ता. उमरगा ), 32 वर्षीय पुरुष (उमरगा शहर ). 

*परांडा तालुका -02.
-21 वर्षीय स्त्री (आवर पिंपरी, पॉजिटीव्ह पेशंट च्या सहवासात )
-50 वर्षीय स्त्री (आवर पिंपरी पॉजिटीव्ह पेशंट च्या सहासात ). 

*तुळजापूर तालुका -05.
-21 वर्षीय पुरुष (जळकोट, ता. तुळजापूर ), 60 वर्षीय महिला (नरिमन पॉईंट, तुळजापूर ), 47 वर्षीय महिला (काणे गल्ली, तुळजापूर ), 30 वर्षीय पुरुष (खडकी तांडा, पॉजिटीव्ह पेशंट चा सहवासात ), 31 वर्षीय पुरुष (सावरगाव, ता. तुळजापूर, पॉसिटीव्ह पेशंट च्या सहवासात ).

बाहेरील   जिल्ह्यातून उस्मानाबाद जिल्ह्यात समाविष्ट झालेले रुग्णाची माहिती


एक 50 वर्षीय पुरुष, ढेकरी ता तुळजापूर पुणे येथे, दुसरा 50 वर्षीय पुरुष पार्डी ता वाशी बार्शी येथे, तिसरा 33वर्षीय  निजामपुरा परांडा येथील सोलापूर येथे, चौथा 47 वर्षीय बावी पोस्ट जांब येथील  सोलापूर येथे, पाचवा 75 वर्षीय खानापूर ता. उस्मानाबाद येथील सोलापूर येथे, सहावा 40 वर्षीय रत्नापूर ता. परांडा येथील बार्शी येथे व सातवा 35 वर्षीय जागजी ता. उस्मानाबाद येथील सोलापूर येथे उपचार घेत आहेत.



*जिल्यातील एकूण संख्या -378.
*आज पर्यंतचे डिस्चार्ज -237.
*आज पर्यंत चे मृत्यू -17.
*उपचाराखालील रुग्ण -124.
 
Top