जळकोट, दि. १२ : मेघराज किलजे

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने गावातील संभाजी नगर भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या भागाला तुळजापूरचे  तहसीलदार सौदागर तांदळे व गटविकास अधिकारी प्रशांत सिंह मरोड यांनी  भेट देऊन या भागाची पाहणी केली.

यावेळी सरपंचपती संजय माने, ग्रामपंचायत सदस्य आशीष सोनटक्के, ग्रामपंचायत सदस्य संजय अंगुले, प्रशासनाचे कर्मचारी आदींच्या उपस्थितीत तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी यावेळी प्रशासनाला सूचना दिल्या. व जळकोट गावाचा आढावा घेतला.
 
Top