जळकोट,दि.१२ : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे कोरोनाने शिरकाव केला असून, संभाजी नगर भागात राहणाऱ्या एक दुकान व्यावसायिक कोरोना बाधित आढळला आहे. याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संभाजीनगर भागासह संपूर्ण गावात सन्नाटा पसरला आहे. सलग तीन दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
जळकोट येथील मुंबई -हैद्राबाद महामार्गावर बसस्थानकाजवळ इलेक्ट्रिक दुकानचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाला कोरोना संसर्ग झाला आहे. सदर व्यावसायिक हा संभाजी नगर भागात राहतो. प्रशासनाने हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. सलग तीन दिवस गावात जनता कर्फ्यू राहणार आहे. जळकोट गावात सन्नाटा पसरला आहे. कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्यांचा प्रशासन शोध घेत आहे. संभाजीनगर भागातील सीमा सील करण्यात आल्या आहेत. सदर रुग्णा चा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर खळबळ माजली आहे. गावात कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सदर रुग्णाचा बऱ्याच लोकांशी संपर्क आल्याने रुग्ण संख्येत वाढ होऊ शकते.
रविवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने ध्वनीक्षेपका द्वारे विनाकारण घराबाहेर पडू नका, काम असेल तरच घराबाहेर या, घरीच थांबा. असे आवाहन करण्यात आले. सलग तीन दिवस संपूर्ण बाजारपेठ बंद राहणार आहे. नागरिकांनी विनाकारण गर्दी करु नये. जळकोट ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. असे आवाहन केल्यानंतर गावात शांतता पसरली आहे. कोरोनाचा फैलाव वरचेवर वाढत असून, जळकोट गावात कोरोना शिरल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. संभाजीनगर भागात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रुग्ण संख्या वाढु नये. याची खबरदारी प्रशासन घेत आहे.
