मुरुम : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालय, मुरूम, ता.उमरगा, जि.उस्मानाबाद येथील राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर विभागामार्फत राज्यस्तरीय निबंधस्पर्धचे आयोजन करण्यात आले असून निबंधाचे विषय पुढीलप्रमाणे आहेत.
महाविद्यालयीन खुला गट
१) कोरोना विषाणूचे राजकारण होत आहे का ?
२) कोरोना आपत्तीत प्रशासकीय यंत्रणांची भूमिका
३) कोरोना : भारत-चीन संबंध
या विषयावर आपले निबंध पीडीएफ स्वरुपात sayabannaghodke@gmail.com/maheshmote96@yahoo.in ईमेलवर किंवा मोबाईल वॉटस्अप नं. 9922829944/9922942362 या नंबरवर (PDF फाईल) निबंध पाठवावेत असे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक सपाटे व राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डाॅ.सायबण्णा घोडके व प्रा.डॉ.महेश मोटे यांनी केले आहे. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ आकर्षक बक्षिसे व सन्मानपत्र दिली जाणार आहेत. याची स्पर्धकांनी नोंद घेऊन दि.२० जुलै २०२० पर्यंत आपले निबंध पाठवावेत असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.
