उस्मानाबाद, दि. 12 : कोविड- 19 रोगाच्या संक्रमनास आळा बसावा यासाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आठवड्यातील शनिवार हा दिवस जनता कफ्यु पाळण्याचे आदेश आहेत. असे असतांनाही त्या मनाई आदेशांचे उल्लंघन करुन दि. 11.07.2020 रोजी 11.30 ते 11.45 वा. चे दरम्यान 1)पठाण महेबुब खान, रा. खाजानगर, उस्मानाबाद यांनी खाजानगर येथे ‘केजीएन पान शॉप’ व्यवसायास चालू ठेवले तर, 2)तानाजी वसंत जठार, रा. गणेशनगर, उस्मानाबाद यांनी त्याचे ‘भवानी मटन शॉप’ व्यवसायास चालू ठेवले.
तर 3)महेबुब अत्तार शेख, रा. उमरगा यांनी आज दि. 12.07.2020 रोजी उमरगा न्यायालया समोर तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्रीसाठी पानटपरी चालू ठेवली. यावरुन पोलीसांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वरील तीघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड- 19 अपाय योजना नियम- 11 सह, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
