उस्मानाबाद, दि. 13 :

उस्मानाबाद जिल्हयात आज सोमवार दि. 13 जुलै रोजी सकाळी 7 काेरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हयात कोरोना बाधितांची संख्या 385 वर पोहचली असून 237 रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर सध्या 131 रुग्णांवर उपचार सुरु असून आतापर्यंत 17 जणांची मृत्यू झाला आहे.

दि. 12/07/2020 रोजी सा. रु. उस्मानाबाद येथून 70 स्वाब नमुने स्वा. रा. तीर्थ. शा. वै. महाविद्यालय, अंबाजोगाई येथे  व 187 स्वाब नमुने वि. दे. शा वै. महाविद्यालय लातूर येथे असे एकूण 257 स्वाब नमुने पाठविण्यात आले होते. त्यापैकी 119 रिपोर्ट्स रात्री उशिरा प्राप्त झाले असून खालीलप्रमाणे आहेत.

- 07 पॉजिटीव्ह.
- 02 rejected.
- 10 अनिर्णित
- 100 नेगेटिव्ह.
- 138 पेंडिंग.

पॉजिटीव्ह रुग्णांची माहिती :-
*भूम तालुका -06.
*27 वर्षीय महिला रा. राळेसांगवी, ता. भूम.
*33 वर्षीय महिला रा. राळेसांगवी, ता. भूम.
*16 वर्षीय मुलगी रा. राळेसांगवी, ता. भूम.
*22 वर्षीय महिला  रा. रामहारी नगर, भूम.
*24 वर्षीय महिला रा. रामहारी नगर, भूम.
*32 वर्षीय पुरुष रा. वालवड ता. भूम.

*कळंब तालुका -01
*31 वर्षीय पुरुष रा. येरमाळा ता. कळंब.

*दि. 13/07/2020 सकाळी 9.00 वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या -385.
 
Top