तुळजापुर : कुमार नाईकवाडी

तुळजापुर तालुक्यात मायक्रो फायनान्स व इतर फायनान्स कडुन होत असलेली सक्तीची वसुली थांविण्यात यावी अशा प्रकारचे एक लेखी निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दि.१३ सोमवार रोजी तुळजापुर तहसीलदार यांना देण्यात आले.

तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटंले आहे की गे, मार्च महिन्यापासून सर्वञ संसर्गजन्य कोरोना रोगा च्या पार्श्वभूमीवर सर्वञ लाँकडाऊन ची परस्थिती असल्याने शेती, उधोग धंदे, व्यवसाय, व्यापार,  नोकरी यावर अर्थिक दृष्टया फार मोठा परिणाम झाला आहे.  शेतकरी, व्यापार वर्ग हातबल झालेला आहे त्यांना दिलासा म्हणुन आर बी आय ने ३१ आँगस्ट पुर्वी कसल्याही प्रकारचे कर्ज वसुली करण्यात येऊ नये असे आदेश दिले असताना   यामध्ये मायक्रो फायनान्स, बजाज फायनान्स, आशा खाजगी फायनान्सने गोरगरीब जनतेकडे हाप्त्याची मागणी करू नये त्यांना हप्त्यासाठी कसल्याही प्रकारचा ञास देऊ नये,त्यांना दंडाचे पैसे भरा,आम्हाला लिहून द्या, दबाव टाकुन नोटीस पाठवून कर्ज भरण्यास प्रवृत करू नये  ज्या फायनन्स चे वसुल दार दमदाटी करून वसुली करीत आहेत त्यांच्यावर तात्काळ गुन्हे नोंद करावेत तसेच त्यांच्यवर योग्य ती कार्यवाही करावी अन्यंथा मनसेच्या वतीने वसुली करणार्या या फायनान्स दाराना  धडा शिकवला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

 या निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष                 महेश जाधव, तालुका अध्यक्ष मल्लीकार्जुन कुंभार, विधानसभा अध्यक्ष  मयुर गाढवे, शहर अध्यक्ष धर्मराज सावंत, तालुका सचिव धनाजी साठे, तालुकाउपाध्यक्ष रोहित दळवी , अक्षय साळवे  ,आकाश पवार, समिर शेख , प्रशांत डोलारे, राहुल गायकवाड , धिरज कदम  शिवाजी झाडपीडे,  मुकुंद देवारे  आदि मनसे सैनिक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहेत.
 
Top