नागपूर, दि. 28 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनाचा कालावधी आता पुढे ढकलण्यात आला आहे. यंदाचा अधिवेशन हे 3 ऑगस्टपासून सुरु होणार होते, मात्र आता त्यांची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता पावसाळी अधिवेशन 7 सप्टेंबरला होणार सुरु होणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशन पुढे ढकलण्याबाबत चर्चा झाली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले जात आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती गंभीर होत जात असताना हे अधिवेशन घेणे तितकेसे सोयीस्कर नसल्याने कामकाज सल्लागार समितीकडून पुन्हा एकदा अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिवेशनादरम्यान मंत्री, आमदार, अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेता आणखी धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कोरोनास्थितीत गर्दी टाळणे, अंतर राखणे हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच, कोणताही धोका न पत्करता हे अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
Top