तुळजापूर‍, दि. 28 :

तुळजापूर शहरातील वासुदेव गल्ली (वडार गल्ली) या ठिकाणी येथे असलेल्या व्यायामशाळेची दुरुस्ती करावी, तसेच व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी मनसेचे शहर उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी तुळजापूर तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  तुळजापूर शहरातील वासुदेव गल्ली (वडार गल्ली) येथे सन 2001 साली व्यायाम शाळेचे बांधकाम झालेले आहे. मात्र सदय परिस्थितीत सदर व्यायामशाळेची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून काही भाग पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सदर ठिकाणी युवकांना व्यायाम करणे कठीण झाले आहे. तरी याबाबत तात्काळ उपाययोजना करून सदर व्यायाम शाळा दुरुस्ती करून व्यायाम साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुळजापूर शहर उपाध्यक्ष अविनाश पवार त्यांची स्वाक्षरी आहे.
 
Top