तुळजापूर : कुमार नाईकवाडी 

दि.१ जुलै हा दिवस डॉक्टर डे म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त तुळजापूर येथील नवनिर्मिती बहुउद्देशीय महिला सामाजिक संस्था व प्रेरणा सामाजिक महिला संस्था यांच्यावतीने येथील उपजिल्हा रुग्णालयातील येथील डॉक्टर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंचला बोडके, डॉक्टर एस.जाधव तसेच डॉक्टर कुतवळ यांचा शाल बुके देऊन संस्थेच्या अध्यक्षा मिनाताई सोमाजी उपाध्यक्ष सौ संध्या खुरुद तसेच अपर्णा बर्दापूरकर व जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्रीकांत कदम आणि पत्रकार संजय खुरुद, सागर परडे यांनी सत्कार केला ‌.

त्यावेळेस मीनाताई सोमाजी बोलताना म्हणाल्या की सध्या संपूर्ण जग गेल्या चार महिन्यापासून कोरोना महारोगाशी लढत आहे. या मध्ये सर्वात मोठा वाटा डॉक्टरांचा आहे दिवस-रात्र रोग्यांची सेवा करत आहेत असा डॉक्टरांचा गौरव करणे हे आमचे भाग्य आहे असे मला वाटते.
 
Top