काटी : उमाजी गायकवाड 

तुळजापूर तालुक्यातील काटी  येथे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य महिला सोनाबाई विठ्ठल क्षिरसागर वय (62) यांचा सर्पदंश झाल्याने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 

याबाबत  सविस्तर माहिती अशी की, सोमवार दि. 29 रोजी सोनाबाई विठ्ठल क्षिरसागर या रोजगाराने दुसऱ्याच्या शेतात खुरपणी करण्यासाठी गेल्या होत्या. शेतातील कामगत झाल्यानंतर घरी येताना घरच्या शेळीसाठी गवत काढत असताना या महिलेला विषारी सापाने चावा घेतला. सर्पदंश झाल्यानंतर त्यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र दोन दिवस मृत्यूशी झुंज देऊन मंगळवार दि. 30 रोजी संध्याकाळी 9 वाजता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
    
त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी 11:30 वाजता काटी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा,सुन, तीन बहिणी, नातवंडे असा परिवार आहे.
 
Top