ताज्या घडामोडी

  


तुळजापुर : कुमार नाईकवाडी 

शहरातील आर्य चौक भागात कोरोना रुग्ण आढळल्याने गेल्या चार दिवसापासुन प्रशासनाने तो भाग तातडीने सील करण्यात आला होता. आर्य चौक येथील कांही भाग प्रभाग क्रं चार हा कंन्टेमेंट झोन मध्ये आल्याने प्रभाग क्रं चार चे नगरसेवक सुनील रोचकरी यांच्या वतीने प्रभाग क्रं ४ भागातील राहणाऱ्या नागरीकांना आषाढी एकादशी पार्श्वभूमीवर दि १ जुलै बुधवार रोजी  घरो घरी फराळाचे साहित्य वाटप केले. यामध्ये  दही, दुध, बटाटे ,मिरची,केळी आदीसह साहित्य प्रत्येक घरा मध्ये उद्दात हेतुने वाटप करण्यात आले.

नगरसेवक सुनील रोचकरी हे या प्रभागात गेल्या चार दिवसापासुन अत्यावश्यक सेवेची मदत करीत असल्याने त्या प्रभागातील नागरीकांमधुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

 
Top