तुळजापुर : कुमार नाईकवाडी
डॉक्टर डे दिनाचे औचित्य साधुन दि. १ जुलै रोजी तुळजापुर नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी व आनंद कंदले मित्र मंडळाच्या वतीने तुळजापूर शहरातील डॉक्टरांचा, ग्रामीण रुग्णालय तुळजापूर येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी आषाढी एकादशी निमित्त ग्रामीण रुग्णालय येथे विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा ठेवुन तुळजापुर शहरातील डॉ. चंचला बोडके , डॉ.आबासाहेब कदम, डॉ.आनंद कदम , डॉ.किरण रोचकरी, डॉ.अभय घोलकर, डॉ.अभय पाटील, डॉ.तेजस काळे, डॉ.श्रीधर जाधव, डॉ.गाडेकर मॅडम, डॉ.विनोद बर्वे, डॉ.सुजित नायकल, डॉ.रेखा बिराजदार, डॉ.दिग्विजय कुतवळ, डॉ.मोहन वट्टे, डॉ.किरण पवार, डॉ.विकास क्षिरसागर, डॉ.सोनवणे मॅडम, डॉ.अभय शिरशीकर यांचा सत्कार नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विशाल रोचकरी, नानासाहेब लोंढे, अभिजित कदम व आनंद कंदले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.