तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 तुळजापुरात कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांना आपण सुरक्षित राहावे तोडांला मास्क लावा वेत कायद्याचे पालन करावे, शहरात पान दुकान चालु करु नये आदीसह विषयावर असे वारंवार सांगुन ही नागरीक मनावर घेत नसल्यामुळे अखेर तुळजापुरचे तहसीलदार सौदागर तांदळे, नगरपरिषद चे मुख्याधिकारी आशिष लोकरे मंडलअधिकारी यांनी दि.३ शुक्रवार रोजी शहरातील सर्व भागातील रस्त्यावर फिरुन मास्क न लावणाऱ्या व मोटार सायकल वर डबल शिट फिरणाऱ्या नागरीकांवर  दंडात्मक कारवाई करण्यात आली.


तसेच  शहरात अनेक  भागात अवैध रित्या पान दुकान चालु करुन त्या ठिकाणी गुटखा मावा विक्री केल्या प्रकरणी शहरातील कांही पान दुकानदार कारवाई करुन त्या पान दुकानास सिल ठोकुन दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मध्ये एकुन ३६  जनावर नागरीकांवर दंडात्मक करुन अंदाजे ७,५०० रुपयाचा दंड नागरीकांकडुन दंड वसुल करण्यात आला.कोरोना संसर्गजन्य रोगाच्या या विशेष मोहीमेत तहसीलदार सौदागर तांदळे ,मुख्याधिकारी आशिष लोकरे मंडल अधिकारी गांदले बाळासाहेब पवार तलाटी इफ्फर तलाटी नगर परिषद चे न.प.अधिक्षक वैभव पाठक,विकास दणाने मुज्जफर शेख, न.प.चे ज्ञानेश्वर टिंगरे सज्जन गायकवाड तहसीलचे जिवन वाघमारे देशमुख ,खडे  आदीसह तहसील कर्मचारी व नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते.
 
Top