तुळजापुर : कुमार नाईकवाडी
येथील हाडको परिसरात एका २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार रोजी पहाटे घडली.
या बाबत सविस्तर वृत असे की, हाडको भागात राहणाऱ्या अजित आनिल भोसले वय वर्षे २३ रा.तुळजापुर यांने दि.३ शुक्रवार रोजी पहाटे २/३० दरम्यान कुमार जाधव यांच्या नातेवाईकाच्या राहत्या घरातील जिन्यावरील टोपी च्या पञ्याच्या आडुला अज्ञात कारणावरुन गळफास लावुन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजु शकले नाही. त्याच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरुन तुळजापुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली मयताच्या पश्छात भाऊ भावजय असा परिवार आहे. सकाळी ११ वाजता येथील आपसिंगा रोडवरील स्मशान भुमीत अंत्य संस्कार करण्यात आले.