जळकोट, दि. ३ : मेघराज किलजे 

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील पार्वती कन्या प्रशालेचे लिपिक श्री. शिवराज राचनप्पा कवठे हे ३८ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त  झाले आहेत .त्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त पार्वती कन्या प्रशाला व शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष व माजी सरपंच श्री. बंकटराव कदम यांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक  महादेव सगर , संस्थेचे सचिव श्री. महेश  कदम, संचालक श्री. बसवराज कवठे, श्री. बबन  मोरे, श्री विश्वनाथ कारले. श्री. नरुणे  व प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ . लता सोमवंशी- कदम, शिक्षक स्टॉप, ग्रामस्थ, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top