तुळजापूर : रविवार रोजी गुरुपौर्णिमा निमित्त तुळजापूर येथील अरण्य मठांत प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमा भक्तीभावाने साजरी करण्यात आली.
यावर्षी कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन येथील भावसार बांधवाने साधेपणाने मोजकेच समाज बांधव घेऊन व सामाजिक दोरी ठेवून अरण्य मठात गुरुपौर्णिमा साजरी केली सकाळी 11 वाजता श्री दत्त मूर्तीचे अभिषेक पूजा करून व महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. यावेळेस उस्मानाबाद जिल्ह्याचे भावसार समाज अध्यक्ष सतीश आंबुरे, उपाध्यक्ष मिलिंद चाडगे, तुळजापूर येथील सुधीर शेळके, नंदकुमार लांडे, सतीश आकुडे, धनंजय हिबारे, महेश खुरुद, बबलू सरवदे, अंबादास माळवदकर ,अमर शेळके व समाजाचे अध्यक्ष संजय खुरुद इत्यादी उपस्थित होते. तसेच पूजनाचा काय पण झाल्यावर अनेक समाज बांधवांनी देऊन गुरूंचा आशीर्वाद घेतला यावेळेस प्रसाद म्हणून लाडू पाडण्यात आले.
