तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 तुळजापुर शहरात गेल्या पाच दिवसापुर्वी संसर्गजन्य कोरोना साथी चा वाढता पादुर्भाव  लक्षात घेता महसुल प्रशासन, पोलीस प्रशासन, व न.प.प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाना ने  दि.२२ ते २६ या कालावधीत शहरात जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. या जनता कर्फ्यू स तुळजापुर शहरातील नागरीकांनी चांगला प्रतिसाद दिला. 

या काळात शहरातील व्यापार किराणा माल आदीसह भाजी मार्केट बंद होते.माञ पाच दिवसाचा जनता कर्फ्यू उठल्या  नंतर दि.२७  सोमवार रोजी तुळजापुर शहरातील नागरीकांनी  शहरातील भाजी मार्केट मध्ये भाजी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.तसेच शहरातील किराणा माल आदीसह व्यापार पेठेतील इतर खरेदीसाठी नागरीकांनी गर्दी केली होती. पाच दिवसापुर्वी रस्त्यावर मोठा सन्नाटा पसरला होता. माञ सोमवारी रस्त्यावर नागरीकांची मोठी गर्दी झाली होती.
 
Top