तुळजापूर, दि. २७ :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस तुळजापूर तालुक्यात शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला दिवसभर तुळजापूर नळदुर्ग आणि तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये शिवसैनिकांनी सामाजिक उपक्रम साजरे करून मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील सावरगाव येथे उपतालुकाप्रमुख प्रदीप मगर यांच्या मुलींनी अत्यंत कल्पकतेने मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसा निमित्ताने खाऊच्या बचतीच्या पैशांमधून गोरगरीब लोकांना किराणा साहित्य वितरण करण्याचा संवेदनशील कार्यक्रम संपन्न केला

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आपत्तीची परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसा बाबत दिलेल्या निर्देशानुसार तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे इयत्ता तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या श्रावणी प्रदीप नगर या छोट्या मुलींनी गेल्यावर्षी वर बचत करून जमा केलेले दोन हजार आठशे वीस रुपये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरीब कुटुंबांना साहित्य वितरण करून खर्च केले आहेत. या छोट्या मुलीने मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक चांगले उदाहरण समाजामध्ये दिले आहे.

तुळजापूर तालुका शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख प्रदीप मगर यांची कन्या कुमारी श्रावणी मगर हिने गेल्या वर्षभर कुटुंबीयांनी खाऊसाठी दिलेले पैसे घरातील गल्ल्यांमध्ये जमा केले ही रक्कम २८२० रुपये होती आणि तिने गतवर्षी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी साठवले होते, त्या साठवलेल्या पैशामधून सावरगाव येथील गोर गरीब कुटुंबांना किरणा साहित्याचे वाटप तालुका उपप्रमुख प्रदीप मगर, विभाग प्रमुख तुळशीराम बोबडे, जळकोटवाडी चे सरपंच गणेश डोलारे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रोदय माळी, सावरगावचे शाखाप्रमुख संजय कोळी, उपप्रमुख विश्वनाथ लिंगफोडे, बाळासाहेब डोके, सुरेश काळे, बाबुराव परीट, सोमनाथ काळे यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आले. याप्रसंगी या चिमुकल्या मुलींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देणारे छोटेसे भाषण देखील ग्रामस्थ समोर केले.

यशवंत मुख्यमंत्री महोदय यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सावरगाव येथे गावातील शिवसेनेचे सर्व नेते आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी वृक्षारोपणाचा चांगला कार्यक्रम पार पडला सावरगाव येथे विविध ठिकाणी वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करण्यासाठी नागरिकांशी चर्चा करण्यात आली याप्रसंगी उपतालुका प्रमुख प्रदीप मगर यांनी वृक्षारोपण शिवाय पर्यावरणाचे संतुलन टिकणार नाही हे राज्य शासनाने सांगितले असून महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांमध्ये वृक्षारोपण केले जात आहे असे सांगितले.
 
Top