खानापूर : बालाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील पूर्वीच्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने काटगावमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.सदरील व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 42 जणांना अहवाल तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
काटगाव येथील एक रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्याने त्याच्या संपर्कातील 22 जणांना अहवाल तापासणीसाठी तुळजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते.यापैकी 10 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत.यामध्ये 1 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.अद्याप 12 अहवाल येणे बाकी आहेत. पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना अहवाल तपासणीसाठी तुळजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.तर काही जणांना होमक्वारनटाईंन करण्यात आले आहे.
कोरोना पेंशेट वास्तव्यास असलेला परिसर व गल्ली प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे.त्या गल्लीला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. .नागरिकांनी घराबाहेर पडू नये काळजी घ्यावी व घाबरून जाऊ नये असे आवाहन काटगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पुंडे यांनी केले आहे.