तुळजापूर : कुमार नाईकवाडी
तालुक्यातील आरळी बु जिल्हा परिषद प्रशाळेचा निकाल 94 टक्के लागला असून शाळेतील गुणानुक्रमे कु.योगिता व्यंकट माने 91.80 % घेऊन प्रथम,शेख अरबाज मौला 90.40% घेऊन द्वितीय,तर कु.गवळी प्रणाली संजय 88.80% घेत तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे. मुख्याध्यापक,शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
मंगरूळ जिल्हा परिषद प्रशाळेचा निकाल 91.40 टक्के लागला असून शाळेतील गुणानुक्रमे कु.शेख मेहर इमामपाशा 96.20% घेवून प्रथम,कु. ढोकळे अर्पिता अरुण 95.60% घेऊन द्वितीय,कु.गरगडे तनुजा ज्ञानेश्वर 92.60 % घेत तृतीय क्रमांक घेऊन यश संपादन केले आहे. मुख्याध्यापक,शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
मंगरूळ इंदीरा कन्या प्रशालेचा निकाल 100 % लागला असून शाळेतील गुणानुक्रमे कु.गरगडे वैष्णवी वसंत 95.40% घेऊन प्रथम, कु.डोंगरे अक्षता सुरेश 93 % तर लोंढे साक्षी सुभाष 92.60 % तृतीय क्रमांक घेऊन यश संपादन केले आहे.संस्थापक अध्यक्ष, मुख्याध्यापक,शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
चिवरी येथील दत्तूआण्णा पाटील माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100 % लागला असून शाळेतील गुणानुक्रमे कुमारी मनशेट्टी प्रतीक्षा बलभीम 94 % घेऊन प्रथम,मुळे गोविंद रघुनाथ 91 % घेत द्वितीय,मनशेट्टी पल्लवी दतात्रय 82.20% तृतीय क्रमांक घेऊन यश संपादन केले आहे.संस्थेचे संस्थापक पोपटराव पाटील,अध्यक्षा सौ.मनिषाताई पोपटराव पाटील यांनी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफचे अभिनंदन केले.
महाराष्ट्र विद्यालय तीर्थ बु. शाळेचा निकाल 91.67% लागला असून शाळेतील गुणानुक्रमे विद्यार्थी कु. नावडे साक्षी शरद 90.20% प्रथम ,कु.स्वाती सोन्याबापू जाधव 86%द्वितीय, पासले संकेत राजेंद्र 86% द्वितीय,कु.पुरी प्रणाली औदुंबर 83.40% तृतीय क्रमांक घेऊन यश संपादन केले आहे.
महात्मा जोतीबा फुले रात्रशाळा तुळजापूर शाळेचा निकाल 73.68 % लागला असून शाळेतील गुणानुक्रमे पुजारी कृष्णा आत्माराम 69.40 % घेऊन प्रथम,भोसले अष्टविनायक दत्तात्रय 64.40 % घेऊन द्वितीय,तर इंगळे आदित्य पांडुरंग 64.20 % तृतीय क्रमांक घेऊन यश संपादन केले आहे.
तुळजापूर येथील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हायस्कूलचा 86.48 % निकाल लागला असून शाळेतील गुणानुक्रमे युवराज धर्मेंद्र कावरे 98.20 % घेत प्रथम,कु.अंजली दादाराव क्षीरसागर 97 % घेत द्वितीय,तर अमान बशीर आतार 96.20% घेत तृतीय क्रमांक मिळवला असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे