जळकोट, दि.२१ : मेघराज किलजे

 तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील शिवाजी चौकातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वर्धापन दिना दिवशी शाखा व्यवस्थापक म्हणून श्री. अनिकेत यादव यांनी व्यवस्थापक पदाचा पदभार स्वीकारला. व्यवस्थापक म्हणून नेमणूक झाल्याबद्दल जळकोट येथील श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय , खातेदार व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या पूर्व व्यवस्थापिका सौ.एस.व्ही. परळकर ह्या ३६ वर्षाच्या बँक सेवेनंतर दि.३१ जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी सांगली येथून अनिकेत यादव यांची नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा वर्धापन दिन दि.२० जुलै रोजी होता. त्याच दिवशी त्यांनी जळकोट शाखेचा पदभार स्वीकारला. त्यांचा जळकोट येथील श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय या संस्थेच्या वतीने व खातेदार, ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष व पत्रकार मेघराज  किलजे यांनी अनिकेत यादव यांचा फेटा, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. व त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच बँकेच्या सर्व स्टाफला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

 यावेळी मावळत्या व्यवस्थापिका सौ.एस.व्ही. परळकर,  सहाय्यक व्यवस्थापिका मेघा चौगुले, सहाय्यक व्यवस्थापक सौरभ माळ बोरगावकर, रोखपाल प्रवीण इंगवले, अल्ताफ जमादार, वक्रंगी केंद्राचे संचालक गणेश वागदरे, शिवराज यादगौडा, तुकाराम कुंभार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विकास चव्हाण, बालाजी पालम पल्ले, शिवराज राचेट्टी, बाबुराव शामराव कदम, आदीसह खातेदार, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top