काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील दहिवडी येथील शेतकरी राजीव बबन आदलिंगे, विकास बबन आदलिंगे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा 2020 भरताना व्हेरिफिकेशन होत नसल्याने अनेकांना अडचणी येत असल्या बाबत तक्रार तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली असून पीक विमा भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै जवळ आली असून या अडचणीमुळे अनेक शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.
निवेदनावर राजीव आदलिंगे, विकास आदलिंगे, बालाजी माळी, सोमनाथ माळी, अंकुश गाटे, पवण अंधारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.