तुळजापूर : कुमार नाईकवाडी
येथील ओम साई माऊली चॅरीटेबल ट्रस्ट तुळजापूर यांच्यावतीने कोरोना च्या पार्श्वभूमीवर तुळजापूर शहरात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रजासक्ती परिवाराचे संस्थापक आनंद कंदले यांना कोविड १९ योध्दा हा पुरस्कार देऊन ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत काळे, पुजारी मंडळाचे माजी संचालक कुमार इंगळे, आठवन ग्रुपचे दत्ता गवळी, युवा नेते भरत सोनवणे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी पञकार संघाचे माजी तालुका अध्यक्ष संजय खुरुद, राजाभाऊ राऊत, संभाजी सुरवसे, युवास्पंदन चे अध्यक्ष महेंद्र कावरे उपस्थित होते.