वागदरी : एस.के.गायकवाड

जि.प.प्राथमिक शाळा संभाजी नगर जळकोट येथे सेवेत कार्यरत असलेले सहशिक्षक डि.एन.सोनवणे याना सत्यशिल सामाजिक संस्था पुणे (वागदरी)ता.तुळजापूर च्या वतीने कोरोना जनसेवा पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

  कोरोना महामारीच्या संकटकाळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  सहशिक्षक संभाजीनगर जळकोट ता.तुळजापूर येथील जि.प.प्राथमिक शाळेत सहशिक्षक डि.एन.सोनवणे हे करत असलेल्या उल्लेखनिय कर्यांची दखल घेऊन त्यांना सत्यशिल सामाजिक संस्थेच्या वतीने सदर पुरस्काराने नुकतेच सन्मानीत करण्यात आले. यावेळी संस्थेचे समन्वय तथा रिपाइं जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, रिपाइं तुळजापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, जेष्ठ कार्यकर्ते उत्तम झेंडारे,राजेंद्र शिंदे वहातुक नियंत्रक महेश डुकरे सह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top