काटी : उमाजी गायकवाड

 तुळजापूर तालुक्यातील काटीचे सुपुत्र तथा उस्मानाबाद येथील प्रसिद्ध उद्योजक सन ग्रृप उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अमरसिंह बाजीराव देशमुख यांची जागतिक स्तरावरील रोटरी क्लब या सेवाभावी संस्थेच्या उस्मानाबाद रोटरी क्लबच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल इंटरनॅशनल लायन्स क्लबचे सांगली जिल्ह्यातील खानापूर  तालुक्याचे माजी अध्यक्ष तथा सांगली जिल्ह्याचे माजी विभागीय अध्यक्ष काटीचे सुपुत्र प्रा. मुस्ताफा इनामदार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 यावेळी नुतन अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी रोटरी क्लब या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून स्वयंस्फूतीने सुरू असलेले समाजोपयोगी कार्य सर्वांच्या मदतीने अव्याहत सुरू  ठेवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
 
Top