नळदुर्ग, दि. 28 :
नळदुर्ग शहरात विविध ठिकाणी महावितरणच्यावतीने जुने पोल काढून नव्याने उभे करण्यात येत असलेले विजेचे पोल सिमेंट कॉन्क्रीट न करता तसेच उभे केले जात आहे. यावर नळदुर्ग शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेत सर्वच्या सर्व विजेचे पोल सीमेंट कॉन्क्रीट करूनच उभे करावेत. कारण भविष्यात धोका निर्माण होउ शकतो. त्याच बरोबर विजेचा खोळंबा होउ शकतो, म्हणून विजेचे पोल उभे करीत असताना सीमेंट कॉन्क्रीट करून उभे करावेत अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आला आहे.
या निवेदनावर जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलीम शेख़, सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,श हर उपाध्यक्ष रमेश घोड़के यांनी स्वाक्षरी केली आहे.